लोहारा/प्रतिनिधी-
जिल्हा वार्षिक योजना 2019- 20 अंतर्गत उमरगा व लोहारा तालुक्यातील तांडा वस्ती सुधार योजेनची अंमलबजावणी करणेसाठी उमरगा तालुक्यातील 31 व लोहारा तालुक्यातील 6 गावांतील वस्त्यांमधील मूलभूत सुविधांच्या कामासाठी एक कोटी 51 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देणार आल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी मिळणेबाबत उमरगा-लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते, जिल्हा नियोजन समितीचा सदस्य या नात्याने सदर कामांना मंजूरी मिळवून घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती यांच्याकडे मागणी केली होती. व सदर प्रस्तावास जिल्हाधिकारी तथा सदस्य जिल्हा नियोजन समितीद्वारे उमरगा - लोहारा तालुक्यातील माकणी 16 लाख, भगतवाडी तीन लाख, नागूर पाच लाख, अंबरनगर, गणेशनगर प्रत्येकी सहा लाख, नाईकनगर (मु.) तीन लाख, डिग्गी चार लाख, नारंगवाडी तीन लाख, त्रिकोळी तीन लाख, बेळंब पाच लाख, चिंचोली (ज) तीन लाख, कराळी तीन लाख, भिकारसांगवी तीन लाख, चिंचोली (भू) तीन लाख, येळी तीन लाख, व्हंताल तीन लाख, भगतवाडी येथे पाणीपुरवठा योजनेसाठी सहा लाख, मुळज सहा लाख, कोरेगाववाडी तीन लाख, आनंदनगर तीन लाख, तुरोरी तीन लाख, तलमोड तीन लाख, नाईचाकूर सहा लाख, कंटेकूर तीन लाख, कवठा तीन लाख, तुगाव तीन लाख, माडज तीन लाख, गुगळगाव तीन तर जगदाळवाडी तीन लाख, चिंचकोटा तीन लाख,केसरजवळगा तीन लाख, कोथळी दहा लाख, होळी चार लाख, जेवळी पाच लाख, बेलवाडी तीन लाख, खेड विद्युतीकरण कामासाठी सहा लाख असा उमरगा-लोहारा मतदार संघातील 37 गावांसाठी एक कोटी 51 लाख रुपया च्या कामांना निधी मंजूर झालेला आहे. या योजने अंतर्गत कामांना मंजुरी दिल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव यांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आभार मानले आहेत.

 
Top