जकेकुर येथील राष्ट्रीय महामार्गावर घडली घटना
उमरगा/प्रतिनिधी-
 तालुक्यातील जकेकुर जवळ जिल्हा परिषद शाळेसमोर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास दोन क्रुजर व ट्रॅक्टरच्या समोरा समोर झालेल्या धडकेत दोन जण ठार तर 11 जण जखमी झाले आहेत.तर जखमीना सोलापूर येथे पुढील उपचारास पाठविण्यात आले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप येथील ख्याडे परिवारातील कांतू निगप्पा ख्याडे यांच्या मुलींचे लग्न बसवकल्यानं येथील माळी परिवारातील मुलाशी होणाऱ्या लग्न सोहळ्यासाठी सोलापूर येथून बसवकल्यानं कडे धावणाऱ्या दोन क्रूजर चा समोरच्या येणा-या विरुद्ध दिशेने चौरस्ता येथून जकेकुर कडे जाणाऱ्या ट्रकटर (क्रमांक एम.एच. 25 5911 ) यास क्रुजर ( के ए 29 एम 2711) ह्या गाडीने ट्रकटर ला जोराची धडक दिली दरम्यान पाठीमागून धावणारी दुसरी क्रूजर क्रमांक एम.एच.13 डी इ.5727 या गाडीने समोरील गादीवर धडक दिल्याने हा विचित्र अपघात झाला.
उमरगा तालुक्यातील जकेकुर येथे समोरासमोर झालेल्या भीषण अपघाता क्रुजर मधील एक जण जागीच ठार झाला लक्ष्मण भिमाप्पा नंदणीकर (वय 52 वर्षे रा आईनापूर,ता अथणी जिल्हा बेळगाव) हा जगीच ठार झाला तर दुसऱ्या जखमी गुरुबाळा मलकरसिद्ध लछने, (रा. मद्रुप ता. दक्षिण सोलापूर) याना  उपचारास नेले असता दवाखान्यात मरण पावला.यात  बारा जण जखमी झाले असून जखमींना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोलापूर ला हलविण्यात आले आहे. जखमींना नरेंद्रचार्य महाराज यांच्या रुग्ण वाहिकेतुन उपचारासाठी नेण्यात आले.जखमी झालेल्या रूग्ण मलसिद्ध इरप्पा मुगळे, (वय 55 वर्षे), गौरीशंकर भगवान सुतार (वय 60 वर्षे), व्हाणप्पा विठ्ठल धुळखेडे (वय 60 वर्षे ), महादेव गुरुबसपा शेळे (वय 65 वर्षे) शिवानंद कलपा नंदुरे (वय 65) जगदेव विठ्ठल धुळखेडे (वय 66), श्रीशैल्य अमोघसिद्ध कुंभार वय 60 अप्पशा सिद्राम लोभे  (वय 44 ), गुरुनाथ सिद्धलिंग माळी (वय 50 ), दुर्योधन महादेव नंदणीकर (वय 60)  हे सर्व रा. मद्रुप ता दक्षिण सोलापूर तर रमेश जिवापा कांबळे (,वय  21 ) (रा. विचूर ता. दक्षिण सोलापूर) यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.

 
Top