उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव शनिवार दि.२१ डिसेंबर रोजी बोलाविण्यात आलेल्या विशेष बैठकीत २८ विरूध्द ३ मतांनी मंजूर करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे चार नगरसेवक फुटले असून त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले आहे.
 पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उस्मानाबाद नगर परिषद मे सध्या शिवसेनेचे नगराध्यक्ष असून पक्षीय बलाबल या प्रमाणे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस १७, शिवसेना ११, बीजेपी ८ व कॉंग्रेस २ या प्रमाणे आहे. उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांनी शिवसेनेतुन बंडखोरी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने उपनगराध्यक्ष पद मिळविले होते. आ.राणाजगजितसिंह पाटील राष्ट्रवादीमधुन भाजपामध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजप यांनी मिळून उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. शनिवार २१ डिसेंबर रोजी झालेल्या या बैठकीला एकुण ३९ पैकी ३० नगरसेवक व ४ स्वीकृत सदस्य उपस्थित होते. तर कांग्रेसचे सिध्दार्थ बनसोडे व विद्याताई एडके, शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव, अक्षय ढोबळे, सिध्देश्वर कोळी, बाळासाहेब काकडे, रूपाली अचलेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अनिता पवार, भाजपाची ज्योती साळुंके हे नगरसेवक गैरहाजर राहिले. शिवसेनेचे चार नगरसेवक प्रेमा पाटील, राणा बनसोडे, अनिता निंबाळकर व सोनाली वाघमारे या नगर सेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपाला साथ देत अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे २८ विरूध्द तीन मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. ठरावाच्या विरोधात स्वत: उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, सेनेचे नगरसेवक राजाभाऊ पवार, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी मतदान केले.
व्हिप व्यर्थ
शनिवारी होणा-या बैठकीसाठी शिवसेनेच्या दोन गुटनेत्यांनी वेगवेगळे दोन व्हिप काढले होते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस ने आपल्या सदस्यांना व्हिप बजावला होता.शिवसेनेमध्ये फुट पडल्याने सौ.प्रेमा सुधीर पाटील यांनी आपणच गटनेता असून आपला व्हिप खरा असल्याचा दावा केला.तर शिवसेनेचे दुसरे गट नेते सोमनाथ गुरव यांनी मी खरा गटनेता असून माझाच व्हीप खरा आहे, अधिकृत गटनेता म्हणून न.प.प्रशासनाकडे माजी नोंद असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आपल्यावर चुकीच्या पध्दतीने अविश्वास ठराव दाखल झाला असून बंडखोर शिवसेना नगरसेवकांवर पक्ष करवाई करेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
                            सुरज साळुंके-शिवसेना

भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्य नितीन काळे म्हणाले की, शहराच्या विकासासाठी अविश्वास ठराव आणने महत्वाचे होते.यापुढे भाजप सक्रीय कार्यरत होवुन शहराच्या विकासासाठी महत्वपुर्ण भुमिका वटवेल, असे सांगितले.
                            नितीन काळे-भाजपा
 
Top