तुळजापूर/प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात पूजेचे ताट ठेवल्यास ते जप्त करण्यात येणार आहे. अनधिकृतपणे मंदिर परिसरात विविध ठिकाणी पूजा ताट व नैवेद्य ताटाची विक्री होत असल्याने मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुजारी किंवा भाविकांनी स्वत: जवळ हे ताट ठेवण्याचे आवाहन केले आहे .यासंदर्भात थेट प्रसिद्धीपत्रकच मंदिरात डकविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात विविध ठिकाणी पूजा ताट व नैवेद्य ताटाची अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात विक्री होत आह. या माध्यमातून भाविकांची मोठी लूट होत आहे. या पाश्र्वभूमीवर मंदिर संस्थानने प्रतिबंध करण्यासाठी मंदिर परिसरात विक्रीसाठी ठेवण्यात आलेली पूजा व नैवेद्य ताटे जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे .तरी भाविक पुजा-यांनी पूजेचे व नैवेद्याचे ताट जप्ती पासून वाचण्यासाठी भाविकाजवळ किंवा स्वत:जवळ ठेवण्याचे आवाहन संस्थानच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. त्यामुळे आता पुजेचे ताट मंदिर किंवा परिसरात ठेवल्यास ते थेट जप्त होणार असल्याचे दिसून येत आहे.

 
Top