विकासकामांना स्थगिती दिल्याबद्दल आ.ठाकूर यांची घणघाती टिका  
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मराठवाड्यातील वॉटर ग्रीड सह ग्रामिण भागातील विविध विकास कामांना फडणवीस सरकारने मंजुरी दिली होती. या विविध विकास योजनांना महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने, आ.सुजितसिंह ठाकुर यांनी आक्रमक होवुन विधान परिषदेत या सरकार वर जोरदार हल्लाबोल केला. आ. सुजितसिंह ठाकूर यंानी बाळासाहेब ठाकरे असताना त्यांचा रिमोट कंट्रोल चालत असे, परंतू आज मातोश्रीच्या रिमोट मधील सेल काढून घेतले आहेत. महाविकास सरकारवर सध्या १० जनपत दिल्ली व सिल्वरओक असे रिमोट असल्याची घणाघाती टिका केली.
विधान परिषदेत आ.सुजितसिंह ठाकुर बोलताना म्हणाले की, दुष्काळग्रस्त मराठवाडा सुजलम सुफलम करण्यासाठी व नागरीकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी फडणवीस सरकारने वॉटर ग्रीड हा महत्वकांक्षी प्रकल्प मंजुर केला होता. त्यासाठी निधीही देण्यात आला होता. या योजनेस महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली आहे. हि स्थगिती उठवावी असे सांगीतले. व तसेच फडणवीस सरकारने मराठवाड्यातील ग्रामिण भागात विविध विकास कामांसाठी 25/15 या तिर्थक्षेत्र विकास कामासाठी कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली होती. यामधील बहुतांश कामांना केवळ कार्यारंभ आदेश देणे बाकी होते. परंतु महाविकास आघाडीने या सर्व कामांना स्थगिती दिली आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने या सर्व कामांना स्थगिती दिली आहे. या योजनांना स्थगिती देवुन महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा व ग्रमिण भागातील गोरगरीब जनतेवर अन्याय केला आहे. हा निर्णय घेण्यासाठी कोणाचा दबाव होता असा सवालही आ.ठाकुर यांनी केला. मराठवाडा कृष्णा पाणी पुरवठा योजनेला गती देण्याचे काम फडणवीस सरकारने केले. या योजनेला निधी देण्याबाबत कसलाच उल्लेख या सरकारने केलेला नाही. हि योजना पुन्हा रखडणार का, अशी मराठवाठवाड्यातील जनतेच्या मनात भिती आहे. या प्रकल्पाला शासनाने निधी दिला पाहिजे. व तसेच अतिवृष्टी बाधीत झालेल्या शेतक-यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देवुन शेतक-यांना भरीव मदत करावी, अशी मागणी आ.सुजितसिंह ठाकुर यांनी केली आहे.
 
Top