उस्मानाबाद/प्रतिनिधी-
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी परिस्थितीवर मात करत शिक्षण घेतल व व त्याचा उपयोग समाज परिवर्तनासाठीच केला.समाज घडवण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा. शिवाजी गायकवाड
येथील रामकृष्ण परमहंस महाविदयालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी व प्राध्यापक, विद्यार्थी,विद्यार्थिनींनी 6 डिसेंबर रोजी अभिवादन केले आहे.
यावेळी प्रा.शिवाजी गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते ते म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी परिस्थितीवर मात करत शिक्षण घेतले व त्याचा उपयोग समाज परिवर्तनासाठीच केला व येथील अस्पृश्य म्हणून दुर्लक्षित केलेल्या माणसांना प्रवाहात आणन्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.आज त्यांना अभिवादन करतांना त्यांचे कार्य समजून घेणे गरजेचे आहे व चांगला समाज घडवण्यासाठी सर्वांनी चांगले शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
यावेळी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,डॉ.बाबासाहेबांनी देशाचे संविधान लिहून गोर,गरिबांना आज समानतेच्सा पातळीवर आणले आहे त्यामुळेच आज गरिब समाजात परिवर्तन होत आहे.आजच्या दिनी डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श विद्याथ्र्यांनी घेतला पाहिजे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ एं. बी. इंदलकर हे होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ. केशव क्षिरसागर यांनी केले. तर आभार प्रा एम.यू. उगीले यांनी मानले. यावेळी सर्व गुरुदेव कार्यकर्ते व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थीत होते.