तुळजापूर/प्रतिनिधी-
श्रीतुळजाभवानी मंदीरात होणा-या चो-या, भांडणे यांचे गुन्हे नोंद करण्यासाठी पुर्वी तुळजापूर पोलिस ठाण्यात यावे लागत होते. याचा ञास भाविकांना होत असल्याने भाविकांसाठी मंदिर पोलिस चौकीत गुन्हे दाखल करण्याची सोय करुन दिल्याची माहीती, उपविभागीय पोलिस आधिकारी दिलीप टिपरसे यांनी दिली.
 श्री. तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकाचे पर्स, मोबाईल, दागिने, पॉकेट चोरी अथवा भांडण तक्रार झाल्यास किंवा कांही गैर प्रकार झाल्यास त्याची तक्रार नोंद करण्यासाठी पुर्वी तक्रारदारांना तुळजापूर पोलिस स्टेशनला यावे लागत होते.यात भाविकांचा वेळ वाया जावुन त्यांना ञास सहन करावा लागत होता.आता तो त्रास होणार नाही, आता भाविकांची कांही तक्रार अथवा अडचणी असल्यास त्यानी श्री तुळजाभवानी मंदिर पोलीस चौकी या ठिकाणी जाऊन आपली लेखी तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.   तरी  भाविकांना आव्हान करण्यात येत आहे की, श्री तुळजाभवानी मंदिर परिसर या ठिकाणी एखादा अपराध घडल्यास किंवा एखादी घटना घडल्यास त्यांनी तात्काळ मंदिर पोलीस चौकी याठिकाणी भेट द्यावी आणि आपल्या गुन्हा नोंदवून घ्यावा, असे आवाहन उपविभागीय पोलिस आधिकारी दिलीप टिपरसे यांनी केले आह.

 
Top