जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी आश्विनी वाले तर तालुकाध्यक्षपदी प्रदिप कदम यांची निवड 
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी दाळींब (ता.उमरगा), येथील पोलिस पाटील आश्विनी विजयकुमार वाले यांची तर उमरगा तालुकाध्यक्षपदी मानेगोपाळचे पोलिस पाटील प्रदिप भानुदास कदम यांची निवड करण्यात आली आहे.
दाळींब येथे बुधवार दि.११ डिसेंबर रोजी पोलिस पाटील संघटनेची उमरगा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव धनंजय गुंड, मिडीया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, सुर्यकांत पाटील, प्रशांत पाटील , पाडुरंग पाटील, सुनिल पाटील, कैलास आडसुळे, आदींची उपस्थिती होती. यावेळी बैठकीमध्ये अध्यक्ष पदी-  प्रदिप कदम, महासचिव- सुधाकर जाधव, उपाध्यक्ष- शिवदर्शन पाटील, कार्यकारी अध्यक्ष- कांचन चव्हाण, कार्याध्यक्ष- युवराज गायकवाड, संघटक -रोहीदास चव्हाण, प्रसिध्दीप्रमुख-नाजेर देशमुख, सहसचिव-गुलब हिरमुखे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष- कलावती चव्हाण, सचिव- सुनिल पाटील, सदस्य-महादेव कुंभार, जिल्हाउपाध्यक्ष पदी मारूती कुंभार यांची निवड करण्यात आली..

 
Top