उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरात होणा-या वाढत्या चो-या, हाणामारीच्या घटना रोखण्यासाठी तसेच रोडरोमियो, गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी उस्मानाबाद शहरात २३ प्रमुख ठिकाणी ६६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी एक कोटी खर्चाच्या कामाला शासनाने मान्यता दिली आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला आहे.
उस्मानाबाद हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. शहरात वाढणा-या चो-या, हाणामारीच्या घटना, रोडरोमीओंचा उच्छाद, व गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी एक कोटीच्या निधीची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून शासनाच्या गृह विभागाने एक कोटीच्या कामाला १३ डिसेंबर रोजी मान्यता दिली आहे.
मंजूर करण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, महत्वाच्या बॅंका, व्यापार पेठा, शहरातील प्रमुख मार्ग, गर्दीची ठिकाणे, महत्वाचे धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे आदी ठिकाण्ी बसविण्यात येणार आहेत.