लोहारा/प्रतिनिधी-
 महाराष्ट्र सदन दिल्ली येथे मराठवाडा संसद पार पडली. यामध्ये मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 20 जिल्ह्यातील युवकांनी केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या सोबत चर्चा करुन मराठवाड्यातील प्रामुख्याने लातूर,नांदेड,परभणी व उस्मानाबाद या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पहाता लोकचळवळी चे स्वरुप देवून व  लोकसहभागातुन हा प्रश्न कसा सोडवता येइल या वर चर्चा केली.
यावेळी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यानी जास्तीत जास्त युवकांचा स्वयं सहभाग वाढवण्याचे व लोकचळवळीसाठी जी मदत लागेल ती करण्याचा विश्वास दिला. यावेळी  शुभम मुळजकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पाणी दुष्काळाचा आढावा मांडला मराठवाड्यात पाणी बचतिसाठी पुर्ण वेळ देवून कार्य केलेले सुनिल सानप याचा जल सांसद पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. या वेळी पाणी फाउंडेशनसाठी योगदान दिलेले शुभम मुळजकर, ज्ञानदेव भताने, महेश चोपणे,नागेश लामदाडे व इतर युवक उपस्थित होते.

 
Top