परंडा /प्रतिनिधी: -  येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे दिनांक 21 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान केंद्रित केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन केले होते.या महोत्सवामध्ये घवघवीत यश प्राप्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कूलगूरु डॉ.प्रमोद येवले यांनी संदेश शिवाजी शिंदे याचा पारितोषीक वितरण समारंभा मध्ये ट्रॉफी देऊन सत्कार केला .केंद्रीय युवक महोत्सवात महाविद्यालयाने सोळा कलाप्रकारात सहभाग नोंदवला होता त्यातील लोक वाद्यवृंद कलाप्रकारात महाविद्यालयाने सांघिक तृतीय क्रमांक पटकावला या कला प्रकारासाठी सुमित कटारे यांनी मार्गदर्शन केले.तसेच एकांकिका प्रकारात वयक्तीक पुरुष अभिनयाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संदेश शिवाजी शिंदे यास पुड्या या एका स्वप्न गर्भाचा मृत्यू एकांकिकेतील पात्रासाठी मिळाले आहे या एकांकिकेचे दिग्दर्शन प्रा संभाजी धनवे यांनी केले होते या युवक महोत्सवातील कलाप्रकारात भाग्यवान रोडगे, सुमित कठारे,संदेश शिंदे,कु.प्रेरणा चव्हाण कु.पूजा शिंदे,महेश खराडे कु,कांचन सरवदे कु.मोहिनी जाधव सुरज रणभोर ,प्रसाद कोकाटे खैरे, प्रदीप जाधव,अभिषेक जीवन,विद्वत कानिफ बनसोडे,उमेश कुंभार यांनी भाग घेतला या संघाचे संग प्रमुख प्रा.संभाजी धनवे,प्रा.डॉ.कृष्णा परभणे श्रीमती कोठुळे यांनी काम पाहिले विजयी संघाचे  श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संस्थेचे सचिव संजय निंबाळकर या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दिपा सावळे संस्कृतीक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतूक केले आहे .प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थाचे पूष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 
Top