उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भारतीय संविधान दिन व 26/11 हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उस्मानाबाद शहरातील टायगर सोशल ग्रुप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समारोह समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अंजुमन हेल्थकेअर सोसायटी या संघटनांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात विविध सामाजिक संस्था, संघटनाचे पदाधिकारी व जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.