उस्मानाबाद,प्रतिनिधी-येथील रायझिंग क्रिकेट ऍकॅडमीच्या राजवर्धन हंगरगेकर, अभिषेक पवारची 19 वर्षाखालील बी. सी. सी. आय. आयोजित कुचबिहार ट्रॉफी अजिंक्यपद स्पर्धेकरिता राज्य क्रिकेट संघटनेच्या अंतिम 15 खेळाडूच्या संघात निवड झाली असून, राजवर्धन हंगरगेकरची गेल्या वर्षी 19 वर्षाखालील भारतीय संघात निवड झाली होती. यापूर्वी ते 14, 16 व 19 वर्षाखालील राज्य संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. अभिषेक पवार यांने 16 वर्षाखालील राज्य क्रिकेट संघाचे कर्णधारपद भुषविले होते. तसेच पवार याने 14, 16 व 19 वर्षाखालील राज्य संघात निवड झाली होती. याच क्लबची राजनंदिनी गुंड हिने मुलींच्या ठाणे येथे झालेल्या राज्य शालेय क्रिकेट निवड चाचणीमध्ये उत्कृष्ठ अष्टपैलू कामगिरी करून तिची मुलींच्या राज्य शालेय क्रिकेट संघात निवड झाली. त्यांना प्रशिक्षक राम हिरापुरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 
संघटनेचे सचिव दत्ता बंडगर, उपाध्यक्ष राम हिरापुरे आणि रायझिंग क्लबचे अध्यक्ष रियाज शेख, अभय गजेंद्र गडकर, नवनाथ डांगे, ऍड. प्रतिक देवळे, युवराज पवार, युवराज घोडके, ऍड. संतोष तानवडे, प्रकाश ढोणे, विल्सन दलभंजन यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडुंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

 
Top