कळंब/प्रतिनिधी-
शिराढोण येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेतील 650 विद्याथ्र्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मानवी कलाकृती मंगळवारी (दि.26) संविधान दिनाचे औचित्य साधून सादर केली. या कलाकृतीस पाहण्यासाठी गाव व परिसरातून नागरिकांनी गर्दी केली होती.
कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराव पाटील, बाळासाहेब माकोडे, सरपंच पद्माकर पाटील, पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील, कलीम बागवान, पाशा पठाण, नासेर पठाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती. शिराढोण येथील चित्रकार राजकूमार कुंभार यांच्या कल्पकतेतून संविधानदिन साजारा करण्यासाठी 650 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांची मानवी कलाकृती 5 हजार चौरस फुटावर अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत साकारण्यात आली. यापूर्वीही राजकुमार यांच्या कलाकृतीनेे विक्रम नोंदवले गेले आहेत. याच शाळेवर डॉ. बाबासाहेबांची 2 हजार चौरसफुटावर रांगोळीतून प्रतिमा, राजमाता जिजाउंची 7 हजार चौरस फूट एवढी रांगोळी, कळंब येथे शिवजयंतीनिमित्त 19 हजार चौरस फूट रांगोळी आदी कलाकृती कुंभार यांनी साकारल्या आहेत. शिराढोण येथील आंतरराष्ट्रीय शाळेत मानवी कलाकृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकराची प्रतिमा साकारली.

 
Top