भारतीय संविधान निर्माण करतांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अफाट मेहनतीने संविधान बनवले व सगळ्यांना समानतेच्या पटलावर आणले आपला देश विविध घटक राज्यांचा,भाषांचा विविधतेचा असला तरी केवळ भारतीय संविधानामुळेच एक आहे.
संविधानामुळेच आपल्या देशात लोकशाही नांदते आहे.संविधानाने नागरिकांना जसे मुक्त स्वातंञ्य दिले आहे तसेच कांही कर्तव्य ही दिले आहेत.ती कर्तव्य आपण पाळली पाहिजेत.आजच्या विद्यार्थ्यांनी संविधान समजून घ्यावे व संविधानाचा अभ्यास करावा असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात, आज दि.२६नोव्हेंबर रोजी "भारतीय संविधान दिन"साजरा करतांना आयोजित व्याख्यानात प्रा.सुनील मोहिते यांनी केले आहे.अध्यस्थानी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख होते.प्रारंभी त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचे पूजन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी उद्देशपञिकेची शपथ घेतली होती.संविधान दिनानिमित्त राज्यशास्ञ,एन.सी.सी,एन.एस.एस विभागाने निबंध,पोष्टर स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यातील विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते गौरविण्यात आले.अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,आपल्या देशाचे संविधान हे श्रेष्ठ आहे.संविधानामुळेच देशात शांतता आहे.या संविधानाचा व संविधानातील कलमांचा आपल्याला अभ्यास असायलाच हवा त्यासाठी आपण संविधान हे अभ्यास करून समजून घ्यावे.
सुञसंचालन डाॅ.केशव क्षीरसागर यांनी केले आभार डाॅ.नितीन गायकवाड यांनी मानले.यावेळी प्रा.बबन सुर्यवंशी प्रा.अतुल देशमुख प्रा.श्रीराम नागरगोजे,प्रा.मोहन राठोड,प्रा.स्वाती बैनवाड,प्रा.राजा जगताप उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी —विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
