
राज्यात शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणुन शपथविधी झाल्यानंतर ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात जिल्हयातील शिवसेना चे ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रा.तानाजी सावंत यांचा मंत्री मंडळात समावेश होईल तर इतर आमदार ज्ञानराज चौगुले व आमदार कैलास पाटील यांना अन्य महामंडळाची जबाबदारी सोपविण्याची शक्यता वर्ताविण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुक २०१९ मध्ये उस्मानाबाद जिल्हयात शिवसेनेचे तीन आमदार निवडुन आले आहेत. तर भाजपासोबत युती असल्यामुळे भाजपा एक आमदार निवडुन आला आहे. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणा-या मंत्रीमंडळात जिल्हयातून शिवसेनेचे प्रा.तानाजी सावंत यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळेसच्या मंत्रीमंडळात प्रा.तानाजी सावंत यांना पाचवी वर्षी शेवटचे दोन आडीच महिण्यासाठी मंत्रीमंडळात त्यांचा समावेश केला होता. जिल्हयात ज्येष्ठ आमदार म्हणुन ज्ञानराज चौगुले यांना ही राज्यमंत्रीपद अथवा समकक्ष महामंडळाचे पद मिळण्याची शक्यता वर्ताविण्यात येत आहे. तिसरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांना महत्वाच महामंडळ अध्यक्ष पद मिळण्याची शक्यता वर्ताविण्यात येत आहे. त्यामुळे उद्या होणा-या मंत्रीमंडळाच्या स्थापनेकडे जिल्हावाशियांचे लक्ष लागले आहे. जिल्हयातुन कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार विधानसभा निवडणुक २०१९ मध्ये त्यंाचा पराभव झाल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांचा समावेश मंत्री मंडळात होण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण व उमरग्याचे औसा मतदार संघातून पराभूत उमेदवार बसवराज पाटील ही महत्वाचे स्थान मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.