निजी वाहनधारकांचा बसस्थानकावरच कब्जा;
उमरगा/प्रतिनिधी-
शहरातील बसस्थानका समोर दररोज खाजगी वाहन चालका कडून प्रवाशांची पळवा पळवी होत असली तरी संबंधित विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने चक्क बस स्थानकावरच खाजगी वाहनाने कब्जा केला आहे. तर दुसरीकडे खाजगी प्रवासी वाहनामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे.
उमरगा आगार हे महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवरील महत्त्वाचे असल्याने येथून राज्या सह परराज्यातील दररोज हजारो प्रवासी मुंबई, पुणे, औरंगाबाद, सातारा, पंढरपूर, तुळजापूर, नाशिक, शिर्डी आदी ठिकाणी तर ग्रामीण भागातील नागरिक येथून प्रवास करतात. परंतु उमरगा आगाराची सध्याची स्थिती पाहता बस स्थानक परिसरात खाजगी वाहन धारकांनी कब्जा केल्याचे दिसून येते. स्थानका समोर व स्थानकातच शंभर फूट अंतरावर रोटरी क्लबच्या वतीने ग्रामीण भागातील प्रवाशां साठी बांधण्यात आलेल्या प्रवासी निवार्या लगतच खाजगी वाहने एकामागून एक उभी करून प्रवाशांची पळवा पळवी करत आहेत. प्रवासी घेण्या वरून अनेकदा वादावादी झाल्या च्या घटनाही घडल्या आहेत. बसस्थानक परिसरात व प्रवेशद्वारावर हा रोजचाच खेळ आहे. याला पायबंद घालण्या साठी राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक नियंत्रका सह कुणाचाच अंकुश नसल्याने बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहने उभी राहत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महामंडळाच्या लाखो रूपयाच्या उत्पन्नावर दिवसा ढवळ्या खाजगी वाहन चालक पाणी फिरवत आहेत.