उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शालेय जीवनात आमच्यावर चांगले संस्कार झाल्यामुळे आम्ही चांगले, जबाबदार अधिकारी, डॉक्टर, अभियंता, राजकारणी बनलो आहोत आमच्या यशात संस्था, शाळा, शिक्षकांचा मोठा वाटा आहे तसेच टीपीएसच्या शिक्षण व शिस्तीमुळे आम्ही घडलो, असे प्रतिपादन मकरंदराजे निंबाळकर यांनी केले.
उस्मानाबाद शहरातील तेरणा पब्लिक स्कुलमध्ये 1980 ते 1992 या कालावधीत शिक्षण पुर्व केलेल्या माजी विद्याथ्र्यांचा मेळावा रविवार दि.24 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष एल.एल.पाटील हे अध्यक्षस्थानी विराजमान होते. सचिव अंनतराव उंबरे, उपाध्यक्ष पद्माकर फंड, पोलिस निरीक्षक भाऊराव बिराजदार, डॉ.भास्कर पाटील, माजी शिक्षक सोमनाथ मार्तंडे, विश्वनाथ आवटे, शिवाजी जावळेकर, संजय रणखांब, ललिता मॅडम, पद्मा मॅडम आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
तेरणा पब्लिक स्कुल मधील माजी विद्यार्थी सोशल मीडियाचा आधार घेऊन जवळपास 30 ते 40 वर्षांनी एकत्र येऊन मेळावे आयोजन करण्यात आले होते. हे माजी विद्यार्थी आज विविध मोठया पदावर कार्यरत आहेत. सैन्य दल, हवाई दल, पायदल, वैद्यकीय क्षेत्र, प्रशासकीय अधिकारी, राजकारण आदी क्षेत्रात कार्यरत आहेत. या विद्याथ्र्यांनी शाळेत मेळावा घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्या वर्गांत बसून शिक्षण घेतले तेथे जाऊन विद्याथ्र्यांसोबत सेफी घेतले. यावेळी माजी विद्याथ्र्यांच्या वतीने शाळे विषयी कृतज्ञता म्हणून संस्थेचे पदाधिकारी, माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर शाळेच्या वतीने ही माजी विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मनोज कोल्हे, सुरेश डोके, महादेव माने, धर्मराज साळुंके, अनंद बोबडे, रणजित फस्के, शंकर शिंदे, विलास मोरे, अॅड. महेंद्र कोळपे-पाटील, अधिक्षक अभियंता पीयुष शर्मा(मुंबई), अॅड. पंकज हराळकर, सत्यनारायण कचोरीया, अॅड.लक्ष्मण सुर्यवंशी, सतिश सुरवसे, रमेश पाटील, डॉ.भगवान आरबाड, डॉ.चंद्रकांत चव्हाण आदी 70 ते 80 माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित होते.यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्याथ्र्यांची भाषणे झाली. आनंदराव सागोळे यांनी प्रस्ताविक तर सतिश सुरवसे यांनी आभार मानले.