उमरगा /प्रतिनिधी- दि. 26 नोव्हेंबर 2019 रोजी तालुक्यातील कदमापूर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कदमापूर येथील बौद्ध वाड्यात हा कार्यक्रम रात्री 8:30 वाजता तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून, सामुदायिक त्रिशरण, पंचशील घेऊन सुरू करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. उपसरपंच दत्ताजी भाले, प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष मा. संतोषजी सूर्यवंशी, उमरगा शहर अध्यक्ष मा. राहुलजी कांबळे, शहर उपाध्यक्ष मा. प्रा. संजीवजी कांबळे, सचिव तात्याराव मादळे हे उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोषजी सूर्यवंशी यांनी भारतीय बौद्ध महासभेची ओळख , कार्य, व महत्व पटवून दिले.
मा. प्रा. संजीवजी कांबळे यांनी भारतीय संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान तसेच स्वतंत्र्य, समता, न्याय, व बंधुत्व या विषयी आपले विचार प्रस्तूत केले.
मा. राहुलजी कांबळे यांनी संविधान दिनाचे महत्व, संविधान जनजागृती , संविधान निर्मिती प्रक्रिया, त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेले कष्ट, संविधान उद्देश पत्रिका, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुत्व हे संविधानाचा आत्मा आहेत तसेच हे तत्व बौद्ध धम्मातुन स्वीकारलेले आहेत असे मनोगत व्यक्त केले. शेवटी फक्त आणि फक्त बौद्ध म्हणूनच आपली ओळख निर्माण करण्यासाठी विनंती केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीपान भाले यांनी केले तर आभार प्रदर्शन गावचे पोलीस पाटील मा. जगजीवन झाकडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंचशील मित्र मंडळ या पथकाने सहकार्य केले. कार्यक्रमास बौद्ध उपासक, उपसिका, आबालवृद्ध, महिला बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट शरण्येतेय गाथेने करण्यात आला.