तुळजापूर/प्रतिनिधी-
समान काम, समान वेतन शासन आदेशानुसार मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्या प्रमाणे मंदिरातील कंत्राटी कर्मचा-यांना 20 ते 22 हजार रुपये वेतन देण्याची मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केले. तसेच मंदिरातील कंत्राटी कर्मचारी कायम होईपर्यंत लढण्याची ग्वाही भोसले यांनी दिली.
शहरातील सराया धर्म शाळेत येथे मंगळवारी (दि.26) तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत सुरक्षा रक्षक विभाग, स्वच्छता कर्मचारी विभाग, इलेक्ट्रिशन, प्लंबर, लिपिक आदी विविध विभागातील कंत्राटी कर्मचा-यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना भोसले म्हणाले की, तुळजाभवानी मंदिर संस्थानचा शिपाई, स्वच्छता कर्मचारी 22 हजार पगार घेत असेल तर आमच्याही कंत्राटी स्वच्छता कर्मचा-यांना 22 हजार पगार मिळाला पाहिजे. तसेच मंदिर संस्थांच्या सुरक्षारक्षकांना 20 हजार पगार मिळत असेल तर कंत्राटी सुरक्षारक्षकांना तत्काळ 20 हजार रुपये पगार द्यावा लागेल, असे ठणकावून सांगितले.

 
Top