एकत्र येत युवकांनी घेतला स्वच्छतेसाठी पुढाकार 

सोशल मिडियाचा उपयोग आरोग्य संवर्धनासाठी
उस्मानाबाद /प्रतिनिधी-
तालुक्यातील बेंबळी येथील जुना पाणीपुरवठा करणारा
बेंबळी येथे ४० वर्षांपूर्वी तत्कालिन पाणीपुरवठा योजनेतून एक तसेच गेल्या १० वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून आणखी एक जलकुंभ बांधण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जलकुंभात पाणी सोडण्यात येत नव्हते. तसेच याची स्वच्छताही करण्याकडे दूर्लक्ष झाले होते. हा प्रकार ‘बेंबळी विकास चर्चा’ या व्हॉटसअॅप ग्रुपवरील युवकांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना स्वच्छता करण्यासाठी आवाहन केले. तेव्हा जुन्या जलकुंभात स्वच्छता करण्यासाठी युवक गेले. यावेळी अॅड. उपेंद्र कटके, गालिबखान पठाण, रणजित बरडे, सद्दाम शेख, गौसभाई पठाण, राजाभाऊ नळेगावकर, शाम पाटील, अविनाश सोनटक्के, दत्ता वाघमारे, राहूल निकम, अनिल दाणे आदी उपस्थित होते. जलकुंभात युवक स्वच्छतेसाठी उतरले असता जलकुंभ अत्यंत जिर्ण व मोडकीस आला असल्याचे निदर्शनास आले. जलकुंभाच्या स्लबच्या भागाचे सिंमेंटचे ढपले पडले होते. तसेच बाजूच्या भिंतींनाही भेगा पडल्याचे आढळले.बाहेरूनही जलकुंभाची मोडतोड होऊन सळया उघड्या पडल्या आहेत. हा जलकुंभ केंव्हाही कोसळण्याची भिती असल्यामुळे जुना जलकुंभ पाडून तेथे नवीन बसवण्यात यावा, अशी मागणी युवकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायतचे चार वर्षांपूर्वी पत्र
ग्रामपंचायतने चार वर्षांपूर्वीच जलकुंभ जिर्ण व मोडकळीस आला असल्याचे पत्र दिले आहे. मात्र, संबंधित विभागाने यासंदर्भात काहीही कारवाई केलेली नाही, अशी माहिती उपसरपंच सत्तार शेख यांनी दिली. आता सोशल मिडीयातील युवक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी जलकुंभासाठी एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धार केला असून लवकरच यासाठी आंदोलन उभे केले जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी युवक सोशलमिडियाच्या माध्यमातून पुढाकार घेत आहेत.
जलकुंभ अत्यंत जिर्ण झाला आहे. याच्या सळया उघड्या पडल्या असून केव्हाही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र येत युवकांनी गावातील जलकुंभ स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बेंबळी विकास चर्चा व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.
 
Top