उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या नीरा-भीमा जोड बोगदा व उद्धट बॅरेजेसच्या कामाची जलसंपदा विभागाचे औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता ए. पी. आव्हाड यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांनी आवश्यक ते मार्गदर्शन करून झालेल्या कामाबाबतही समाधान व्यक्त करत लवकरात लवकर काम पूर्ण होण्याबाबत सूचना केल्या.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत नीरा-भीमा जोड बोगदा व उद्धट बॅरेजचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या या कामास शासनाने 4932 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास 2003 च्या शासन निर्णयानुसार मान्यता देऊन 4 फेब्रुवारी 2004 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. परंतु, नंतरच्या काळात अनेक वर्षे निधीअभावी तसेच लवादाचे नियम, तांत्रिक प्रक्रियेत ही योजना अडकली होती. दरम्यान, मागील चार ते पाच वर्षात या योजनेला गती देण्याचा प्रयत्न झाला. यातूनच सहा शाफ्टद्वारे हे काम सुरू करण्यात आले. यातील आतापर्यंत 9.450 किलोमीटरचे बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामास जलसंपदा विभागाचे औरंगाबादचे मुख्य अभियंता ए. पी. आव्हाड यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी करत आवश्यक त्या सूचना देत आतापर्यंतच्या कामाबाबतही समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत उस्मानाबादचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सुदर्शन पगार, कार्यकारी अभियंता कृष्णा घुगे, अभियंता राहुल घनवट, प्रकाश पाटील, रामचंद्र खंदारे, संबधित विभागाचे अभियंता व कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते.