उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबादसह शेजारील जिल्हयात अल्पावधीत रूपामाता उद्योग समूहाने नावलौकीक प्राप्त केला आहे. त्या आनखी भर म्हणून तालुक्यातील पाडोळी येथे रूपामाता मल्टीस्टेटची भव्य इमारत उभारण्यात येत आहे. या इमारत बांधकाचा शुभारंभ संस्थापक चेअरमन एड. व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते करण्यात आला.
रूपामाता उद्योग समूह के माध्यम से अॅड. व्यंकटराव गुंड यांनी शेतकरी, शेतमजूर यांचे हित जोपासत पाडोळी येथे भव्य वेअर हाऊसची उभारणी, शेतक-यांचा जोड व्यवसाय असलेल्या दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी म्हणून दुध प्रकल्पाची उभारणी तसेच शेतक-यांना ऊस गाळपासाठी सुरू केलेला कारखाना हे परिसरातील शेतक-यांसाठी वरदान ठरत आहेत. तसेच शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. रूपामाता बॅंक व मल्टीस्टेटच्या माध्यमातून अनेक तरूणंना रोजगार उपलब्ध झाला आहे. शिवाय शेतक-यांना अर्थसहाय्य, युवकांना उद्योगासाठी अर्थसहाय्य देऊन त्यांना स्वतङचा व्यवसाय सुरू करण्यासही हातभर लावला आहे. त्यामुळे रूपामाताने शेतकरी, शेतमजूर, युवकांचा विश्वास संपादन केला असून त्याच जोरावर घोडदोड शुरू है । यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड, सोसायटी के चेअरमन भरत गुंड, मनोज गुंड, सहदेव ढाकरे, नरसिंग पवार, रामदास गुंड, अमोल काले, कुंडलीक लांडगे, जीवन चव्हाण यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top