लोहारा/प्रतिनिधी-
 लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाने औरंगाबाद येथे झालेल्या युवा महोत्सवात मुक अभिनय  गटातुन तृतीय क्रमांक पटकावला.
महाविद्यालय औरंगाबाद व भानुदासराव चव्हाण महाविद्यालय लोहारा यांच्यात हा पुरस्कार देवगिरी विभागुन देण्यात आला. महामहाविद्यालयांने भारुड, मुक अभिनय, समुह गायन, रांगोळी, गोंधळ गीत, वक्तृत्व इत्यादी प्रकारामध्ये सहभाग नोंदवला होता. पुरस्काराचे वितरण दि.24 नोव्हेंबर रोजी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  औरंगाबाद येथे करण्यात आले.
सर्व विजेत्यांचे संघ प्रमुख प्रा.व्यंकट चिकटे, प्रा.अनुसया साठे, सहकारी प्रा.शितल गायकवाड, प्रा.मेघराज टापरे, प्रा. अशोक भोसले, श्रीकांत वाडीकर, स्वागत जगताप व सहभागी विद्यार्थी यांचे मराठवाडा शिक्षण प्रसार मंडळांचे सरचिटणीस आ.सतिश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतिश इंगळे,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.बिराजदार, उप प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी, अधिक्षक हंगरगेकर व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आदींनी अभिनंदन  केले.
 
Top