कळंब/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तालुक्यातील बाभळगावच्या जिल्हापरिषद प्राथमिक शाळेला शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या हस्ते दि. 26 रोजी स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रयत्नामुळेच तालुक्यातील बहुतांशी शाळा इ-लर्निग व डीजीटल करण्यात आल्या आहेत त्यातील प्रत्येक केंद्रातील एका शाळेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने डीजीटल कक्ष कींवा इ-लर्निग कक्ष करुन देण्यात आला आहे. त्यानुसार आज गौर केंद्रातील बाभळगावच्या शाळेत डीजीटल कक्ष तयार करण्यासाठी स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. तसे गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार ही मान्यवरंच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे ,राज्य चिटणीस भक्तराज दिवाने शिक्षण विस्तार अधिकारी अशोक साखरे जिल्हाउपाध्यक्ष अनिल बारकुल तालुका अध्यक्ष दत्ता पवार कार्याध्यक्ष प्रशांत घुटे शिक्षक संस्थेचे संचालक नागेश टोणगे ,धनाजी अनपट , केंद्रप्रमुख कीसन जगदाळे, शेलगाव शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र शिनगारे, मुख्याध्यापक शत्रुघ्न घुले, शाळेतील शिक्षक विलास मुंढे, श्रीमती सुषमा मसे , प्रतिभा पवार-पाटील, आरती कवडे , संजय गायकवाड, बालाजी टेकाळे, शेटीबा सोनवणे यांच्या सह गावातील नागरीक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विलास मुंढे व प्रतिभा पवार - पाटील तर आभार संजय गायकवाड यांनी मानले