लोहारा/प्रतिनिधी-
शासनाने लोहारा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत द्यावी, अशा विविध मागणीचे निवेदन लोहारा तालुका शिवसेना यांच्यावतीने तहसीलदार विजय अवधाने यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात परतीच्या पाऊस जास्त झाल्यामुळे सोयाबीन, तुर, मका, द्राक्ष, केळी, बागायती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे शेतक-यांना तातडीची हेक्टरी 25 हजार रुपयाची मदत देणे गरजेचे असुन आजपर्यंत मदत मिळाली नाही. तरी शेतक-यांना तात्काळ मदत करावी. व तसेच सामान्य जनतेचे वयोवृध्द व संजय गांधी निराधार योजनेचे सुध्दा वृध्द व विधवा महिलांना खुप दिवस झाले मानधन मिळाले नाही. तरी अतिवृष्टी झालेले शेतक-यांचे हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई व वयोवृध्द व विधवा महिलांची पगार याबाबत शासनाला कळवुन आठ दिवसाच्या आत द्यावी, अन्यथा लोहारा तालुका शिवसेनेच्यावतीने तहसीलकार्यालयावर शेतकऱ्यांचा व वृध्द महिलांचा मोर्चा काढण्यात येईल, तसेच तालुक्यातील आष्टामोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे, उपजिल्हा प्रमुख नामदेव लोभे, शहर प्रमुख सलीम शेख, नगरसेवक शाम नारायणकर, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, युवा शहर प्रमुख श्रीकांत भरारे, ग्रा.पं.सदस्य नितीन जाधव, सुरेश दंडगुले, प्रेम लांडगे, रोहीत काडगावे, दत्ता मोरे, शाखा प्रमुख रमेश जाधव, दिलीप लोभे, कुंडलीक सुर्यवंशी, पोपट सुर्यवंशी, कुलदीप गोरे, अमिन कुरेशी, सलीम सय्यद, अमीन सुंबेकर आदी उपस्थित होते.