तेर /प्रतिनिधी-
जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात एकाच वेळी सर्व गावांच्या पाण्याचा ताळेबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मानाबाद तालुक्यात हे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून जानेवारी 2020 पर्यंत हे काम पुर्ण होणार असल्याची माहिती ज्ञानप्रबोधिनीचे समन्वयक सचीन सूर्यवंशी यांनी दिली.
उस्मानाबाद तालुक्यातील पाण्याच्या ताळेबंदाचा आधार घेऊन वर्षाचक्र आणि पिकचक्र यांचे नियोजन जलसंधारण, पाण्याचा संतुलित वापर या बाबी यामुळे साध्य होणार आहेत. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, यशदा जलसाक्षरता केंद्राचे संचालक सुमन पांडे, उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, ज्ञान प्रबोधिनी हराळीचे कार्यकर्ते कल्याण औटे आदी बैठकीस हजर होते अशी माहिती सुर्यवंशी यांनी दिली. महाराष्ट्रातील जनतेला जलसाक्षर करणारा उस्मानाबाद पहिला जिल्हा व तालुका असेल असेही सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
 
Top