तुळजापूर/प्रतिनिधी-
निधी- मराठा सोयरीक  संघटनेच्या वतीने तिर्थक्षेञ तुळजापूर येथे घेण्यात येत असलेल्या  24 वा राज्यस्तरीय विनाशुल्क मराठा सोयरीक वधू-वर थेटभेट परिचय मेळावासाठी शहरातील पाच  महिला बचत गटांनी अर्थिक मदतीचा दिला.येथील मराठा  समाज वधू-वर मेळावा  समितीच्या वतीने मंगळवार  दि. 19 रोजी  5 वाजता  येथील  दुर्गा भक्त निवास,  माऊली नगरमध्ये   वधू-वर   परिचय मेळावा नियोजनाची प्रमुख  पदाधिका-यांच्या उपस्थितीत   चौथी  बैठक उत्साहात  संपन्न झाली.  या बैठकीत स्थानिक पदाधिका-यांशी चर्चा करुन मेळाव्यासाठी किती वधू-वर  येणार,  त्यांचे  नियोजन कशा पद्धतीने  करावयाचे, त्या नियोजन कमिटीवर सदस्यांची नियुक्ती,  सामाजिक विषयांवर चर्चा घडवून विवाह इच्छुकांसाठी मेळावा फार्म भरून घेणे,  विवाह इच्छुकांना, पालकांना नाव नोंदणी कशी करायची, येणा-या वधू-वर,  पालकांची भोजन व्यवस्था, होर्डिग्ज, पॉम्पलेंट, निधी संकलन, राज्यभरासह तालुक्यात  कार्यक्रमाची प्रसिद्धी  करणे, मराठा  समाज  उन्नती, नियोजनाच्या जबाबदा-या, मान्यवरांना कार्यक्रमाचे मेळाव्यास निमंत्रण देणे आदी विविध विषयांवर सविस्तर  चर्चा संपन्न झाली. या बैठकीत सई महिला बचत गट, रेनूका महिला बचतगट, कुल स्वामींनी बचतगट,माऊली महिला बचतगट, मुक्ताई महिला बचत गट माऊलीनगर तुळजापूर  यांच्या  वतीने ऐकतीस   हजार रुपये निधी  देण्यात आला. या बैठकीत मराठा समाज पदाधिकारी यांच्या सुचनांचे स्वागत  करुन  मेळावा समितीच्या वतीने त्यांचा आदर सन्मान  करण्यात आला.यावेळी जेष्ठ नागरिक  आप्पासाहेब पाटील, दुर्गादास अमृतराव, माजी  नगराध्यक्ष  सज्जनराव साळुंके,  नगरसेवक  अमर(भैय्या) मगर, राहूल खपले, बाळासाहेब कुतवळ, जयकुमार   पांढरे,  मारूती नाईकवाडी, सुयोग आमृतराव, युवराज पवार,उमेश भिसे, राजाभाऊ माने, सतीश दरेकर,  धनाजी रोचकरी, सौ.मधूमती अमृतराव,  लक्ष्मी कुमार करडे पाटील, सौ.  स्मीता खोपडे, सौ. मंगल पवार, सौ.मिना ताई दुरगूडे, मंदाकिनी पवार आदीसह रेणुका  महिला  बचत गट, सई महिला  बचत गट, माऊली महिला  बचत गट, कुलस्वामिनी  महिला  बचत गटातील  महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

 
Top