तुळजापूर /प्रतिनिधी-तिर्थक्षेञ तुळजापूर येथे काळभैरव जयंती मंगळवार दि.19 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथील डोंगराचा कड्यावर कालभैरव मंदीर आसुन तसेच त्यासोबत याठिकाणी अष्टभैरव नवदुर्गा अशीही अनेक महत्त्वपूर्ण आणि अध्यात्मिक स्थान आहेत याचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तुळजापूर आणि उस्मानाबाद यांच्या वतीने तुळजापूर येथील अतिशय पुरातन अशा श्री काळभैरवनाथाचे मंदिरामध्ये कालभैरव काळभैरव अष्टकस्तोत्र या स्तोत्राची हवन युक्त सेवा तसेच दीपप्रज्वलन रांगोळी काढून तसेच महाआरती घेऊन श्री काळभैरव जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला
या निमित्त तुळजापूर शहरातील अनेक भाविक भक्त, श्री स्वामी समर्थ सेवेकरी उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तुळजापूर आणि उस्मानाबाद यांच्या वतीने आयोजित केलेल्या काळभैरव जयंती हे सातवे वर्ष होतं याचप्रमाणे अनेक भाविक भक्त हे तुळजापूर शहरात येऊन या सेवेमध्ये काळभैरव जयंती निमित्त सहभागी होत असतात.