उस्मानाबाद/प्रतिनिधी-:-उपप् रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनासाठी नवीन मालिका MH-25-AR सुरू करण्यात येत आहे.
वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठया प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते. व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याच्यावर ताण पडतो व बऱ्याच वेळा नागरिकांना त्रास होतो.नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा, त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा,यासाठी ज्या दुचाकी मालकांना आकर्षक तसे पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील, त्यांनी दि.25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंतच्या सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी केवळ (क्रमांक-16 अन्वये जारी झालेला डीडी) पत्याचा पुरावा, ओळखपत्र , पॅनकार्डाच्या साक्षांकित प्रतीसह स्वत: जमा करावा. हा डीडी फक्त DYR.T.O.OSMANABAD यांच्या नावे नॅशनल लाईज /शेडयुल्ड बॅकेचा असावा. या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरविले जातील. एसबीआय च्या तांत्रिक अडचणीमूळे युनियन बॅक ऑफ इंडियाचे बँकेचे डीडी स्वीकारले जाणार नाहीत, तसे डीडी व्यतिरिक्त क्रमांक-12 अन्वये बँकेने जारी केलेले बँकर्स चेक स्वीकारले जाणार नाहीत.
अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम -4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहित केलेल्या पत्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. (उदा.लाईट बिल,फोन बिल इ.) एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.2 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डावर लावण्यात येईल.या यादीतील अर्जदाराना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा एकच डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार दर्शविलेल्या दिवशी सिलबंद लिफाप्यात कार्यालयात जमा करावा.लिलावासाठी सादर केलेला डीडी रूपये 300 पेक्षा कमी रक्कमेचा नसावा. हा डीडी फक्त DYR.T.O.OSMANABAD यांच्या नावे नॅशनल/शेडयुल्ड बॅकेचा असावा या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील तसेच उस्मानाबाद एसबीआय तांत्रिक अडचणीमूळे युनियन बॅक ऑफ इंडियाचे बॅकेचे डीडी स्वीकारले जाणार नाहीत, डीडी कमीतकमी एक महिना मुदतीमधील असवा. दि.4 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 12.30 वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,उस्मानाबाद यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तींसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डीडी सादर केला असेल, त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही.नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेल्या नोंदणी क्रमांक आपोआप रदद होईल व फी सरकार जमा होईल.कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही. अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.
आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीचे प्राधिकारपत्र यांचा नमुना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध आहे.नवीन दुचाकी मालकीचे वेळापत्रक दिनांक तपशील:- दि. 25 नोव्हेंबर 2019 ते 30 नोव्हेंबर तिप्पट शुल्क चे अर्ज व दुचाकी वाहनासाठी अर्ज स्वीकारणे वेळ 11.00 ते 4.00 कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, दि.2 डिसेंबर 2019 सकाळी 11.00 वाजता यादी जाहिर दि.3 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत बंद लिफाप्यात लिलावासाठीचे रुपये 300 पेक्षा जास्त रक्कमेचे डीडी जमा करणे गरजेचे दि.4 डिसेंबर 2019 रोजी तिप्पट शुल्कांचा आलेल्या अर्जासाठी व दुचाकी वाहनासाठी आलेल्या अर्जासाठी लिलाव दुपारी 12.30 वाजता, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,उस्मानाबाद गजानन नेरपगार यांनी कळविले आहे.