उस्मानाबाद/प्रतिनिधी-रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा यांच्या वतीने जिल्ह्यातील शेतकरी बंधू व भगिनींना शेती, हवामान, बाजारभाव, शासकीय योजना, आरोग्य, व्यावसाय व नोकरी याविषयीची माहिती ध्वनी संदेशाच्या माध्यमातून मोफत पुरविली जाते. या सेवेचं उद्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक सौ. शोभा कुलकर्णी या उपस्थित होत्या. उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ हजार शेतकरी बांधवांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेमुळे शेतकरी बंधू व भगिनींना शेती, हवामान, बाजारभाव, शासकीय योजना, आरोग्य, व्यावसाय व नोकरी याविषयीची माहिती मिळण्यासाठी मदत होणार आहे.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेती, हवामान, बाजारभाव, शासकीय योजना, आरोग्य याविषयीची माहिती हवी असल्यास त्यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या निःशुल्क क्रमांक १८००४१९८८०० या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन रिलायन्स फाउंडेशनचे व्यवस्थापक श्री. संदीप गुंजाटे यांच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी श्री.श्रीकांत कोळी यांनी परिश्रम घेतले.