उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजापुढे व शासनाच्या प्रत्येक अधिकारी-कर्मचा-यापुढे एक आदर्श घालून दिला आहे. त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय या ठिकाणी स्वत: रक्तदान केले आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, ते केल्याने एखाद्याचा जीव आपण वाचवू शकतो, त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे, रक्तदान ही काळाची गरज आहे,असा संदेशच आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी स्वत: रक्तदान करून दिला आहे.
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राज गलांडे -पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन बोडके, रक्त संक्रमण अधिकारी डॉ.अश्विनी गोरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री.महादेव शिनगारे,अधिसेविका श्रीमती सरस्वती बागडे, समाजसेवा अधिकारी श्री.गुणवंत रसाळ, समाजसेवक श्री.ज्ञानोबा शेळके,अधीक्षक विठ्ठल कांबळे, रक्तपेढी सुपरवायझर श्री. दिनकर सुपेकर, रक्तपेढी तंत्रज्ञ श्री. अक्षय जगताप, रक्तपेढी तंत्रज्ञ , श्री.गणेश साळुंखे, सामाजिक कार्यकर्ता, जीवन अमृत सेवा 104 धनाजी खोतकर, मुकादम वर्ग-4 राशिद काझी व रक्तपेढीतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.