वाशी/प्रतिनिधी -
येथील छत्रपती शिवाजी विद्यालय , वाशी या विद्यालयातील कु . श्रेया बापूसाहेब सावंत इ . 7 वी व प्रसाद काकासाहेब गवारे इ . 5 वी या दोन विद्याथ्र्यांना आदर्श गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झाला आहे. अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला जिल्हा समिती, सोलापूरचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  शेया बापूसाहेब सावंत व प्रसाद काकासाहेब गवारे छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशीचे एक हुशार, होतकरू,राष्ट्रावर अपार प्रेम करणारे आदर्श गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यावेळी श्री . खटाणेसाहेब (पोलीस उपनिरीक्षक , वाशी ) , श्री . दादासाहेब चेडे ( उपाध्यक्ष ) , श्री . डी . बी . कोकाटे (मुख्याध्यापक), छत्रपती शिवाजी विद्यालय , वाशी यांचेकडून गौरवपत्र , सावित्रीबाई फुले प्रतिमा , रविंद्रनाथ टागोरांची प्रतिमा , शाल , पुष्पहार , मायाकन गौरविण्यात आले . कथामालेचे श्री . अवधूत म्हमाणे (अध्यक्ष , सौ . आरती काळे (उपाध्यक्ष) , श्री. अशोक खानापुरे (कार्यवाह), श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ , बार्शीचे श्री. बी. वाय. यादव (अध्यक्ष), श्री. नंदनजी जगदाळे (उपाध्यक्ष), श्री. व्ही. एस . (दादा) पाटील (जनरल सेक्रटरी), श्री. पी. एल. पाटील, श्री. टी . पी . शिनगारे , श्री. सुरेश ( बप्पा ) पाटील , श्री . एस . के . मोरे , वाशी नगरपंचायतचे श्री . सुरेश ( बप्पा ) कवडे , श्री. गौतम गायकवाड सर्व सदस्य , विद्यालयातील शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी , पालक वर्ग , ग्रामस्थ , विद्यार्थी , विद्यार्थीनी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

 
Top