परंडा/ प्रतिनिधी - परंडा तालुक्यातील अनाळा येथे बळिराजा चेतना अभियान अंतर्गत तीन दिवशीय कृषी प्रेरणा प्रशिक्षण संपन्न झाले. दि. २२ नोहेंबर ते २४ नोव्हेंबर या दरम्यान हे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये त्रस्त कटुंबांना शेतीविषयी, शेळीपालन, गाय- म्हैस पालन या विषयी मार्गदर्शन अभियानचे गणेश गवळी यांनी केली. प्रशिक्षणाासाठी उपस्थित सदस्यांना कृषी माहिती पुुस्तिका संच भेट देण्यात आला.या प्रशिक्षणासाठी अनाळा, मलकापूर, कंडारी, रोहकल , साकत, पिस्तमवाडी येथील साठ शेतकरी सहभागी झाले होते. प्रशिक्षणार्थी त्रस्त शेतकऱ्यांसाठी नाष्टा व जेवणाची सोय बळीराजा चेतना अभियानच्या वतीने करण्यात आली होती. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी उमेद अभियानच्या अनाळा येथील प्रेरिका नौशाद शेख यांनी सहकार्य केले.
 
Top