उमरगा/प्रतिनिधी -
शहरातील पतंगे डांबरी रस्त्याच्या कामाचा सहा महिन्यांपूर्वी कार्यारंभ आदेश देऊनही गुत्तेदाराने अद्याप काम सुरू केले नसल्यानें या भागातील त्रस्त नागरिकांनी येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू नाही झाल्यास पालिकेला टाळेठोक आंदोलन करण्याचे अडीचशे नागरिकांच्या सह्याचे निवेदन  पालिकेच्या मुख्याधिका-यांना नागरिकांनी दिले.
निवेदनात म्हंटले आहे की,उमरगा शहरातील पतंगे रोडचे महामार्गापासून बसवेश्वर विद्यालयापर्यंत नवीन डांबरीकरण करण्याचे काम मंजूर झालेले असून संबंधित कामाची निविदप्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित पात्र कंत्रातदारास कार्यारंभ आदेश ही सहा महिन्यांपूर्वी देण्यात आला आहे पण अद्याप काम सुरू झालेले नाही.या रस्त्यावरून दररोज जाणारे नागरिकांना अंत्यत खराब या रस्त्यामुळे पाठीचा,मणक्याच्या,कमरेचा आजार होत आहेत तसेच रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात मोठ्या संख्येने होत आहेत याबाबत नावरीकांनी वेळोवेळी तक्रारी देऊनही हे काम चालू करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे.
येत्या आठ दिवसात जर या रस्त्याचे डांबरीकरण सुरू नाही झाल्या येत्या 28 नोव्हेंबर रोजी पालिकेला टाळे ठोक आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर समाजिक कार्यकर्ते मनोजकुमार जाधव,माजी नगरसेवक दत्ता रोंगे,डॉ.दामोदर पतंगे,डॉ.लक्ष्मीकांत डिग्गीकर,डॉ.अनिकेत इनामदार,डॉ. हरळयया,माजी नगराध्यक्ष पोपटराव सोनकांबळे,राजेंद्र पाटील,राजेंद्र उबाळे,युसुफ बागवान आदींसह अडीचशे नागरिकांच्या सह्या आहेत.
 
Top