उस्मानाबाद/प्रतिनिधी-अवैध दारू विक्री करणा-याविरुध्द मुरूम पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.25) गुन्हा दाखल झाला. राजेंद्र चौधरी (रा. आष्टाकासार, ता. लोहारा) हे सोमवारी (दि.25) आष्टाकासार येथे दारूचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 37 लिटर गावठी दारूसह देशी दारूच्या 3 हजार 866 रुपयांच्या बाटल्या बाळगून होता. उस्मानाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आढळून आले. याप्रकरणी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला.