उस्मानाबाद/प्रतिनिधी- महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय,मुंबई शासन निर्णय क्रं. एससीवाय 2019/प्र.क्र.220/म-7दि.31 ऑक्टोंबर 2019 अन्वये खरीप हंगाम 2019 अन्वये दुष्काळ व्यवस्थापक संहिता 2016 मध्ये विहीत केलेल्या निकषानुसार खरीप 2019 च्या हंगामातील परिस्थितीच्या आधारे जिल्हयातील परंडा तालुक्यात दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली असून दुष्काळाच्या दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण   करण्यात आले.त्यानुसार जिल्हयातील परंडा तालुक्यात मध्यम स्वरुपात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
यानुसार परंडा तालुक्यातील 96 गावांना जमीन महसूलात सूट,पिक कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती,कृषी पंपाच्या चालू वीजबिलात
33.5 टक्के सूट,शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी,रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर,टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची जोडणी खंडीत न करणे, या सवलती उपलब्ध करुन देणेबाबत संबंधित विभागांना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेश दिले आहेत.
 
Top