परंडा/प्रतिनिधी-
जागतिक वारसा सप्ताहनिमित्त येथील भुईकोट किल्ल्यात रा. गे. शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ कला शाखेच्या विद्याथ्र्यांनी स्वच्छता मोहीम राबविली.
रा. गे. शिंदे महाविद्यालयातील इतिहासप्रेमी, विद्यार्थी, प्राध्यापकांनी सोमवारी (दि.25) सकाळी किल्ल्यामध्ये प्रवेश केला आणि स्वच्छता मोहीम राबविली. किल्ला परिसरातील गवत, झाडेझुडपे, प्लास्टिक आणि कचरा गोळा करून किल्ल्याला सुशोभित करण्यात खारीचा वाटा उचलला. यावेळी 60 विद्याथ्र्यांनी या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर विद्यार्थ्यांनी किल्ल्याची पूर्ण पाहणी करून काही ऐतिहासिक घटना घडामोडी जाणून घेतल्या. यावेळी प्रा. डी. व्ही. मांजरे, प्रा. डॉ. राऊत, प्रा. डॉ. विशाल जाधव, प्रा. बी. वाय माने, प्रा. डॉक्टर सज्जन यादव आदीसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

 
Top