कळंब /प्रतिनीधी -
२६ नोव्हेंबर १९ ४९ रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानाला मान्यता मिळाली म्हणून हा दिवस " भारतीय संविधान दिन " म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून कळंब तालुक्यातील शासकीय कार्यालय , स्थानिक स्वराज्य संस्था , सामाजिक स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने हा दिवस संविधान उद्देशिकेचे वाचन करुन साजरा करण्यात आला . याबाबत बातमी अशी की , उपविभागीय अधिकारी कार्यालयालयात कार्यालयीन कर्मचारी वाय . वी .हारकर, बी .पी . खडबडे , मीरा माळी , किशोर देटे , डी .जी . मंडलीक ,यांच्या उपस्थितीत वाचन करण्यात आले . कळंब पोलिस स्टेशन, मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक , अशोक पवार , पोलीस कर्मचारी , हंगे , आंबुरे, तांबडे , शिंदे , जाधव , राऊत , वाघमोडे ,आदी पोलीसांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले, तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तालुका कृषी अधिकारी अशोक संसारे यांच्या उपस्थितीत कृषि कर्मचारी सचिन ढेरे , नंदकुमार कदम , भोपलकर, महेश पोतदार , श्रीमती कवडे , कांबळे , गणगे यांच्यासह कृषि विभागाच्या कर्मचारी यांनीही संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले . तर मुख्य कार्यक्रम शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ संविधान उद्देशिका प्रतिमा ठेवून येथील माजी नगरसेवक सुनिल गायकवाड, आरपीआय (आठवले गट) तालुकाध्यक्ष शिवाजी सिरसट, मेजर राऊतमामा, प्रमोद ताटे, पत्रकार अविनाश घोडके, सतपाल बचुटे, चरणसिंग गायकवाड, मुकुंदमामा साखरे, लोजपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, अमोल गायकवाड, सी.आर.घाडगे, अविनाश जावळे यांच्या उपस्थितीमध्ये राज्यघटना प्रतिमेचे पूजन करून संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी बौध्द बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते. तसेच तालुक्यातील ईटकूर येथे भिमनगरमधील बौध्द बांधवांनी सकाळी 8.30 वाजता बुध्द विहारासमोरील प्रांगणात एकत्रित येवून घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची भारतीय राज्य घटना सुपूर्द करतेवेळीची प्रतिमा ठेवून त्या प्रतिमेचे उपासक मिलिंद रणदिवे, राहूल रणदिवे, सदाशिव शिंदे, शंकर शिंदे यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी पत्रकार लक्ष्मण शिंदे यांनी उपस्थितांकडून संविधान उद्देशिकेचे वाचन करून घेतले. यावेळी पुरूषोत्तम शिंदे, रितेश लगाडे, अक्षय शिंदे, प्रसन्नजित शिंदे, विश्वजीत शिंदे, परमेश्वर रणदिवे, रोहित रणदिवे, अंशुमन सोनवणे, शिवाजी शिंदे, सौरभ शिंदे, आकाश शिंदे, लखन रणदिवे, अमित सोनवणे, रोहित शिंदे, रोहित लगाडे आदींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. तर ग्रामपंचायत कार्यालयातही संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी सरपंच अभिमान आडसूळ, उपसरपंच महादेव पावले यांनी प्रतिमेचे पूजन केले तर ग्रामविकास अधिकारी बी.बी.सोनवणे यांनी यावेळी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. यावेळी आण्णासाहेब आडसूळ, पोतदार, कर्मचारी बाबुराव शिंदे, रोहित आडसूळ, गणेश आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. तर ईटकूर जि.प.प्रशाला शाळेत संविधान दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच अभिमान आडसूळ, मुख्याध्यापक एन.बी.पखाले यांनी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना शिक्षकांसह पत्रकार लक्ष्मण शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या दिनाचे औचित्य साधून जि.प.शाळेत वक्तृत्व स्पर्धा, विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रामविकास अधिकारी सोनवणे, उपसरपंच पावले, माजी ग्रा.पं. सदस्य राहूल रणदिवे, मिलिंद रणदिवे, गोकुळ कदम, पोपा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक सय्यद यांनी केले. तर आभार क्षीरसागर यांनी मानले. तालुक्यात विविध ठिकाणी शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था याचबरोबर ग्रामीण भागातील समाजबांधवांनी एकत्रित येवून भारतीय संविधानाचे सामुहिक वाचन केले.
