उस्मानाबाद/प्रतिनिधी-
एका प्रकरणात दाखल तक्रारी अर्जावर कार्यवाही न करण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणा-या पोलिस हवालदारासह इतर दोन खासगी व्यक्तींना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून गजाआड केले. ही कारवाई बुधवारी (दि.27) उस्मानाबादेत करण्यात आली.
याप्रकरणातील तक्रारदार हे ट्रक चालकाचा व्यवसाय करतात. त्यांच्यासह कुटुंबीयांविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल झाला होता. सदरील अर्ज शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदार कबीरदास भुजंगराव गायकवाड(49) याच्याकडे कार्यवाहीसाठी होता. यावेळी पोलिस हवालदार गायकवाड याने खानापूर येथील अशोक शामराव गायकवाड व विनोद खंडु गायकवाड या दोन खासगी व्यक्तींमार्फत तक्रारदाराकडे याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केली. परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे दि.25 रोजी तक्रार केली. या तक्रारीची एसीबीने शहानिशा केली असताना हवालदार गायकवाड याने इतर दोघांच्या माध्यमातून लाचेची रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दि.27 रोजी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताच हवालदारसह इतर दोघांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यातच गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पथकाचे उपाधीक्षक रवींद्र थोरात, पोलिस निरीक्षक ए.एच.हुलगे, कर्मचारी सर्जे, कठारे, उगलमुगले, जाधव, बेळे, पवार, चालक कांबळे आदींनी यशस्वी केली.