उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मालवाहतूक वाहनाने दिलेल्या धडकेत एका 11 वर्षीय मुलाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. हा अपघात दि.25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 8.15 वाजेदरम्यान कळंब तालुक्यातील खर्डा येथे घडला. यामध्ये रियाज नूर सय्यद (रा. खर्डा) यांनी ताब्यातील मालवाहतूक वाहन (एमएच 25 एजे 0384) निष्काळजीपणे चालवून निखिल मधुकर कांबळे (11) या बालकास धडक दिली. या अपघातामध्ये निखिलचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चालकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top