उस्मानाबाद/प्रतिनिधी-
छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आयुष्य वाहिले तर त्यांची प्रेरणा घेवूनच वस्ताद लहुजी साळवे यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते , माजी मंत्री प्रा . लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
उस्मानाबाद येथे आयोजित कार्यक्रमात (दि.20)ते बोलत होते . उस्मानाबाद येथे आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची 225 ची जयंती बुधवारी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. नगर परिषद समोरील चौकात लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर यशराज लॉन्सच्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश सदस्य नितीन काळे, प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून यांनी विचार व्यक्त केले.
या प्रसंगी भाजपा मीडियाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, प्रदेश सदस्य अॅड. व्यंकट गुंड , नपचे गटनेते युवराज नळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गोविंद कोकाटे, पांडुरंग पवार, मीनाताई सोमाज, अनिता तोडकर, पूजा रोड ,अमोल पेठे, नवनाथ उपळेकर, शेखर देडे , माणिक साठे, माजी जि. प. सदस्य अंजली वेताळे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अॅड . पूजा देडे यांनी केले . सुत्रसंचालन श्रीराम मुंबरे तर आभार देडे यांनी व्यक्त केले. यावेळी श्री शिंदे, काळे , रणदिवे , अँड . गुंड , डॉ . कोकाटे , सोमाजी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.