उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सामाजिक व्यवस्थेत समग्र परिवर्तनासाठी जाती संस्था नष्ट होणे गरजेचे होते त्यासाठी छञपती शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात उत्कृष्ट कार्य केले होते यासाठी त्यांनी आपल्या चुलत बहिणीचा विवाह इंदोरच्या होळकर कुटुंबियात करून देऊन मोठे समाजपरिवर्तन करून सामाजिक ऐक्यासाठी पाऊल टाकले होते यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी छञपती शाहू महाराजांचे समाजपरिवर्तनाचे विचार समजुन घ्यावे असे प्रतिपादन प्रा.अर्जुन जाधव(विचारवंत)यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील इतिहास विभाग व सामाजिक शास्ञे अभ्यास  मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व्याख्यानात आज दि.30 नोव्हेंबर रोजी केले आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.ए.बी.इंदलकर होते.प्रारंभी मान्यवरांनी डॉ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे आणि छञपती शाहू महाराज यांचे प्रतिमाचे पूजन केले .
पुढे बोलताना प्रा.जाधव म्हणाले की,समाजपरिवर्तन हे शिक्षणातूनच होते यासाठी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात प्राथमिक शिक्षण कायद्याने सक्तीचे केले त्यामुळेच आज शिक्षणाचा प्रचार व प्रसार झाला आहे.आंतरजातीय विवाहासाठी त्यांनी प्रोत्साहान दिले त्यामुळेच जातीयप्रथा नष्ट होण्यास सुरवात झाली त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी सहकार्य केले होते.त्यांच्या विचारांचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले .प्रास्ताविक प्रा.नील नागभिडे यांनी केले.सूञसंचालन भैरवनाथ वाकोडे या विद्यार्थ्याने केले.यावेळी प्रा.विकास सरनाईक,प्रा.राजा जगताप,डॉ.नितीन गायकवाड उपस्थित होते.यावेळी व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी खुपच गर्दी केली होती.
 
Top