तुळजापूर/प्रतिनिधी -
स्ञीशक्ती देवता श्री.तुळजाभवानी मातेच्या नगरीत मराठा सोयरीक संघटनेच्या वतीने रविवारी (दि.1) होणा-या राज्यस्तरीय वधुवर थेटभेट  परिचय मेळावा राज्यात  ऐतिहासिक ठरणार असुन यात राज्यसह परराज्यातील सुमारे दोन हजार वधुवर उपस्थितीत राहणार असल्याची माहीती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जवजांळ पाटील यांनी शुक्रवार (दि.29) रोजी पञकार परिषदेत दिली.
शहरातील पुजारी मंडळ मंगल कार्यालयात रविवारी होणा-या राज्यस्तरीय नि:शुल्क वधुवर परीचय थेट भेट मेळाव्याचा आयोजनासंबधी माहीती देण्यासाठी  पञकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी सुनील जवजाळ पाटील , अप्पासाहेब पाटील, सज्जन सांळुके, उत्तम अमृतराव, मधुमती अमृतराव, लक्ष्मी करडे, सुनिता कदम यांनी माहीती देताना सांगितले की, या संघटनेची स्थापना 29 नोव्हेंबर 2016 रोजी झाली असुन याचा उद्देश सोशल मिडीया माध्यमातून विनाशुल्क लग्न जमवुन रक्ताची माणसे एकञ करणे आहे. यामुळे राज्यासह परराज्यात विखुरलेले रक्ता  माणसे जोडले जाणार आहेत. आज पर्यत राज्यात 23 मेळावे घेतले असुन यातुन दहाहजार लग्न जुळले आहे.  तिर्थक्षेञ तुळजापूरचा मेळाव्यात सावित्री च्या लेकिचे मोठे योगदान असुन त्यांचाच मार्गदर्शनाखाली हा  मेळावा संपन्न होत असल्याने तो ऐतिहासिक इतिहास घडवणारा मेळावा ठरणार आहे. आमच्या संघटनेचे 33 जिल्हयातील 303 तालुक्यात  बायोडाटा गु्रप असुन त्याध्दारे बायोडाटा अदान प्रदान होत असल्याने येथे मोठ्या संखेने वधुवर उपलब्ध झाले आहेत. मराठा समाजाचे प्रत्येक खेड्यात पन्नास वधु वर आहे शेतकरी वरांना मुली देण्यास धजवत नाहीत या बाबतीत आम्ही जनजागृती करीत आहोत 
 
Top