उस्मानाबाद/प्रतिनिधी-शहरातील सांजा चौकात असलेल्या
रामकृष्ण आश्रमात भगवद्गीतेचा संदेश आणि विवेकानंद या विषयावर स्वामी विष्णुपादानंद महाराज यांचा प्रवचन सोहळा रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
रामकृष्ण मिशन ही जगप्रसिध्द सेवाभावी संस्था असून त्याची स्थापना स्वामी विवेकानंदानी १८९७ साली कलकत्ता येथे केली होती. या संस्थेच्या भारतात व भारताबाहेर २०० शाखा आहेत. उस्मानाबाद येथील रामकृष्ण आश्रम हे औरंगाबाद येथील रामकृष्ण मशिन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या कांही वर्षांपासून चालू आहे. आत्मनो मोक्षार्थ जगदृहीतायच या ब्रीद वाक्यावर आधारीत रामकृष्ण मिशन शैक्षणीक, सामाजिक, आरोग्य आदी बाबत कार्य करते. रविवारी होणा-या प्रवचन कार्यक्रमास युवा वर्गासहीत सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन रामकृष्ण आश्रमच्या वतीने करण्यात आले आहे.