उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथे दि. 10, 11 व 12 जानेवारी 2020 या कालावधीत आयोजित होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उस्मानाबाद नगरपालिकेकडून दीड लाखाचा निधी देण्याचा ठराव बुधवार दि. 20 नोव्हेंबरच्या बैठकीत न.प. नगरसेवकांच्या तातडीच्याव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.अ.भा. मराठी साहित्य संमेलनास निधी देण्याबाबत शासन निर्देशानुसार दीड लाखाची मदत पालिकेला करता येते ती मदत पालिकेकडून करुन साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने उस्मानाबाद शहरात स्वच्छतेची मोहिम राबविणे तसेच साहित्य संमेलनासाठी शहरात येणा-या हजारो नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालय, मुतारीची सोय करणे तसेच संमेलन स्थळाची स्वच्छता ठेवणे, संमेलनासाठी येणा-या असंख्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे, संमेलनाच्या अनुषंगाने धाराशिव शहर व परिसरातील तसेच जिल्ह्यातील विविध ऐतिहासीक व धार्मिक तसेच पर्यटन स्थळांची माहिती देणारे फलक व स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे फलक व वॉलपेंटींग पालिकेकडून केली जाणार आहे.
संमेलन काळात येणा-या नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी उस्मानाबाद नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. या बैठकीत संमेलनाच्या अनुषंगाने नागरी सुविधाबाबत व शहर स्वच्छतेबाबत विविध उपाय योजना करण्याचे या तातडीच्या बैठकीत सर्व नगरसेवकांच्या संमतीने ठरावास मंजूरी देण्यात आली.यावेळी पालिकेचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, न.प. मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, नगरसेवक सोमनाथ गुरव, उदय निंबाळकर, बालाजी कोरे, सुरेश गवळी पंगुडवाले, सिद्धेश्?वर कोळी, अक्षय ढोबळे, युवराज नळे, माणिक बनसोडे, अभय इंगळे, खलिफा कुरेशी आदिसह इतर नगरसेवक व महिला नगरसेवक उपस्थित होत्या.