उस्मानाबाद/प्रतिनिधी-स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील नागरिकांची जनजागृती करण्यासाठी व विद्याथ्र्यांच्या कलेला वाव देण्यासाठी भिंत्तीचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेद्वारे शहरातील सर्व शासकीय कार्यालयाचे संरक्षण भिंतीवर चित्र काढण्यात येऊन स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे. या स्पर्धेमुळे नगर परिषदचे २५ लाख रूपयांची बचत झाली आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
नगर परिषद परिसर व जिल्हा न्यायालयाच्या परिसरात या भित्तीचित्र परिषदेचे आयोजन करण्यात आले हेाते. आयोजनामध्ये ग्रीनी संस्था, रोटरी क्लब आणि क्रीडाई संस्था व नगर परिषद यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन केले आहे.नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी सांगितले की, गेल्या एक वर्षांपासून यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. स्वच्छ भारत अभियानातंर्गत ग्रीनी संस्था, घनकचरा वर्गीकरणासंदर्भात सर्वेक्षण, जनजागृती आणि पाठपुरावा करण्यासाठी संस्थेची नेमणुक केली आहे. या संस्थेद्वारे शहरात विविध कार्यक्रम घेतले जातात. आजच्या भिंतीपत्रिकेच्या स्पर्धेसाठी पहिल्या टप्यात ४० विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला.स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्याथ्र्यांना प्रमाणपत्र मिळणार असून वर्षभर प्रत्येक महिन्यात अशा प्रकारची भित्तीचित्र स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. सगळयात उत्कृष्ट चित्रास खास बक्षिस देण्यात येईल, असेही नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी जाहीर केले.
यावेळी रोटरी क्लबचे सुधाकर भोसले, क्रीडाईचे प्रदिप मुंडे, न.प. चे मुख्याधिकारी मनोहरे, ग्रीनी संस्थेचे अमोल गायकवाड, शिवसेना गटनेता सोमनाथ गुरव, राजर्षी शाहु शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व्यंकटेश देशमुख, गट शिक्षणाधिकारी पारवे, नगरसेवक युवराज नळे, आरोग्य निरीक्षक कांबळे, पडवळ, अजय सुर्यवंशी आदी उपस्थित होते.