रुईभर /प्रतिनिधी- तालुक्यातील रुईभर येथे भगवान श्री खंडेराय मुर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन दि. 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. हरिनाम सप्ताह निमित्त काकडा, भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, भावार्थ रामायण - लक्ष्मण शक्ती अध्याय 1ते7, हरिकिर्तन व हरिजागर तसेच हरिकिर्तन ह.भ.प. तानाजी महाराज भोयटे, ह.भ.प. शिवाजी महाराज बारगुळे, ह.भ.प. जगन्नाथ महाराज गव्हाणे, ह.भ.प. मधुकर महाराज निंबाळकर, ह.भ.प. हरिभाऊ महाराज निंबाळकर,  ह.भ.प. दत्ता महाराज आगळे, ह.भ.प. सुभाष महाराज गुंडगिरे, तर काल्याचे किर्तन ह.भ.प. नवनाथ महाराज चिखलीकर दि. 2 डिसेंबर दुपारी भगवान खंडेराय यांची मुर्ती स्थापना व कलश रोहन सोहळा दत्त संस्थानचे अप्पादेव व रुईभर मठाचे भगवान गिरी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर ह.भ.प. अप्पादेव यांचे प्रवचन होणार आहे. व्यासपीठ चालक म्हणून सौदागर धुमाळ, मुकुंद लोमटे,  नारायण वडवले, जीवन लोमटे, श्रीकांत लोमटे, शाम निंबाळकर, पांडूरंग कुंडलिक कोळगे यांची सेवा लाभणार आहे, तरी या सर्व कार्यक्रमाला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन समस्त रुईभर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top