उस्मानाबाद /प्रतिनिधी-
केशेगाव शिवारातील शेडमधून दोन लाख रुपयांचे शेती साहित्य चोरून नेल्याप्रकरणी सोमवारी (दि.25) बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
24 ते 25 नोव्हेंबर रोजी भारत डोलारे (रा. केशेगाव, ता.उस्मानाबाद) यांच्या केशेगाव येथील शेतातील शेडचे कुलूप तोडून ठिबक सिंचन साहित्य, फवारणी पंप, विद्युत केबल असा एकूण 1 लाख 95 हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला. 
 
Top