उमरगा /प्रतिनिधी-
तालुक्यातील मुळज येथील रहिवासी तथा जेष्ठ नागरिक निळोबा जयवंत जांभळदारे - शिंदे (वय 102 वर्षे) यांचे बुधवारी, दि. 20 रोजी सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. अशोक जांभळदारे-शिंदे यांचे ते वडील होत. बुधवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top